मुंबईः कांदिवली पूर्व येथे विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शाळेच्या बसमधील ६१ वर्षीय सहाय्यकाला समता नगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपीने पीडित मुलीचा शाळेच्या बसमध्ये विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसांकडे केली होती. त्यानुसार समता नगर पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – मुंबई : उद्वाहनात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

हेही वाचा – मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : एका वर्षात दुसऱ्यांदा निवडणूक स्थगित, विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण

पीडित मुलगी सोमवार, १६ सप्टेंबर रोजी शाळेच्या बसमधून जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीची आई आरोपीला घेऊन पोलीस ठाण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी समता नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४ व पोक्सो कायदा कलम १० व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी कांदिवली पूर्व येथील रहिवासी असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.