मुंबई : गोरेगाव येथे बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र पित्याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – भाडेपट्ट्यात सवलत न दिल्याने म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!
सत्तावीस वर्षीय आरोपी बेरोजगार असून त्याची पत्नी कामाला जाते. शनिवारी आरोपीची पत्नी कामाला गेली असता त्याने राहत्या घरी सावत्र मुलीवर अत्याचार केला. आई परत आल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर महिलेने तत्काळ याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. शासकीय रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.