मुंबईतील मालवणी भागात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने भटक्या श्वानावर अ‍ॅसिड फेकले आहे. या अ‍ॅसिड हल्ल्यात कुत्र्याला त्याचा डोळा गमवावा लागला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३५ वर्षीय सबिस्ता अन्सारी तिच्या इमारतीत काही मांजरींना खाऊ घालते. कुत्रेही या मांजरींसोबत असतात. मांजरींसोबत राहत असल्याच्या रागातून तिने कुत्र्यावर (ब्राऊनी) अ‍ॅसिड फेकले आहे. या घटनेची माहिती मिळताच, अभिनेत्री जया भट्टाचार्य आणि तिची टीम ब्राउनीला वाचवण्यासाठी पुढे आली. त्यानंतर ब्राउनीला भट्टाचार्य यांनी स्थापन केलेल्या थँक यू अर्थ या एनजीओकडे नेण्यात आले. या संस्थेकडून गरजू प्राण्यांवर उपचार केले जातात. ब्राउनीच्या दुखापतींचे तपशील असलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.

हेही वाचा >> क्षयरोगावरील औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल, औषध खरेदीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला खार

भट्टाचार्य म्हणाल्या की, “जे मांजरींवर अन्याय करतात, ते दुसर्‍या प्राण्यांवर हल्ला करतात हे धक्कादायक आहे.” या महिलेने कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. अ‍ॅसिड फेकल्यानंतर कुत्रा प्रचंड विव्हळला. त्या वेदनेतच तो इतरस्त्र भटकत होता.

मालवणी पोलिसांनी अन्सारीविरुद्ध भारतीय दंड संहिता प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ब्राऊनी कुत्रा सोसायटीच्या आवारात फिरतो. हे कुत्रे मांजरींसोबत असल्यानंतर अन्सारी सतत कुत्र्यांना त्रास देते, ती त्यांना पळवून लावते, असं या तक्रारीत नमूद करण्यात आल आहे. अनेक प्राणी मित्र संघटनांनीही या कृत्याचा निषेध केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai shocker woman throws acid at stray dog animal loses one eye in chilling attack cctv video surfaces sgk