मुंबई : Sion Bridge close for demolition शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला जाणार असून त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीत आणखी भर पडणार आहे. शीव उड्डाणपूल बंद झाल्यास पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या पालक-विद्यार्थ्यांची प्रचंड दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन ११२ वर्षे जुन्या उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. तसेच पुढील दोन वर्षांच्या कालावधीत पुलाची पुनर्बांधणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र त्याचा फटका धारावीतील शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे. धारावीतील अनेक मुलांच्या शाळा या शीव, माहीम, माटुंगा, दादर परिसरात आहेत. त्यामुळे अनेकजण पालकांबरोबर दुचाकीने शाळा गाठायचे. तर, अनेकजण शालेय बसद्वारे प्रवास करायचे. मात्र, पूल बंद झाल्यास पर्यायी मार्गाने पूर्ण वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. तसेच वाहतूक कोंडी वाढणार असल्याने, शाळेत वेळेत पोहचण्यासाठी विद्यार्थीं आणि पालकांना लवकरच घर सोडावे लागणार आहेत.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
two wheeler driver died in Akola on Tuesday after his throat was cut by nylon manja
नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू
khopte bridge loksatta latest news
उरण : खोपटे पुल दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबूतीकरण
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली

हेही वाचा >>> नवीन महाबळेश्वरमध्ये दुर्गम भागात पोहोचण्यासाठी रोप वेचा पर्याय, विकास आराखड्यात रोप वे प्रस्तावित

२३ बेस्ट बसच्या मार्गात बदल

एकूण २३ बेस्ट बस मार्ग प्रभावित झाले असून उड्डाणपुलाची पुनर्बांधणी पूर्ण होईपर्यंत हे मार्ग बदललेल्या मार्गांनी चालवले जात आहेत.

दीड लाख वाहने पर्यायी मार्गाने

* शीव उड्डाणपुलावरून दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक वाहने ये-जा करत होती. मात्र, उड्डाणपूल बंद झाल्याने, ही वाहतूक इतरत्र वळविण्यात येणार आहे. वाहनांना धारावीतील ६० आणि ९० फूट रस्त्यावरून प्रवास करावा लागेल. तसेच इतर पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करा; उच्च न्यायालयाचे महापालिका, रेल्वे प्रशासनाला आदेश

* शिव शिक्षण संस्था, डीएस हायस्कूल, एस.आय. ई.एस.कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, गुरु नानक कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, सायन म्युनिसिपल हायस्कूल यासारखी अनेक शैक्षणिक संस्था शीव परिसरात आहेत. * वाहतुकीसाठी पूल बंद झाल्यानंतर, २० दिवसांनी स्लॅब तोडण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाडकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. रविवारी आणि रात्रकालीन ब्लाॅक घेऊन ही कामे केली जातील. यासह दोन मोठे रेल्वे ब्लाॅक घेण्यात येतील.

Story img Loader