मुंबई: लोकसभा निवडणूक तोंडावर असताना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद उफाळून आला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार खासदार राहूल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे तेथे गटबाजी सुरू आहे. या गटबाजीला कंटाळून विभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुख गिरीश धानुरकर यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला.

लोकसभा निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना त्यात आता राजकीय पक्षांमधील वादावादीही चव्हाट्यावर येऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्षही त्याला अपवाद नाही. शिवसेना पक्षाने आपली उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्या पूर्वीपासूनच दक्षिण मध्य मुंबईत खासदार राहूल शेवाळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित झालेले होते. त्यामुळे परिसरात त्यांनी कामही सुरू केले होते. मात्र त्यांना तेथील अंतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. माहीम, धारावी, वडाळा या तीन विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख गिरीश धानुरकर यांच्या राजीनाम्यामुळे या विभागात काही आलबेल नसल्याचे उघड झाले आहे. धानुरकर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी आपली खदखदही व्यक्त केली आहे.

government schemes Eknath shinde marathi news
सर्वसामान्यांच्या योजना कायम राहणार – मुख्यमंत्री
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Tejashwi Yadav on Nitish Kumar
Tejashwi Yadav on Nitish Kumar: ‘नितीश कुमार आमच्याकडे हात जोडत आले’, तेजस्वी यादव यांचा आरोप; म्हणाले, “पुन्हा चूक…”
नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
Jagdish Muliks hopes increased after Pankaja Munde is given responsibility of three constituencies in Pune
मुंडेंकडे जबाबदारी अन् मुळीकांच्या आशा पल्लवीत! वडगावशेरीमध्ये महायुतीत चुरस
Eknath shinde ganesh naik dispute marathi news
१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री वाद?
Former Indapur MLA Harshvardhan Patil is rumored to be going to NCP Sharad Chandra Pawar party pune
हर्षवर्धन पाटीलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश कठीण? इंदापूरमध्ये इच्छुकांची संख्या जास्त

हेही वाचा : आजपासून वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील प्रवास महागणार, नवीन पथकर दर लागू

या विभागातील माहीम मतदारसंघातील आमदार सदा सरवणकर आणि खासदार राहूल शेवाळे यांचे फारसे पटत नसल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील हा वाद आता उफाळून आला आहे. सरवणकर यांच्या शिफारशीमुळेच धानुरकर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गेल्या काही महिन्यांपासून आमदार सरवणकर व त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे आपल्याला पदाधिकाऱ्यांमार्फत मानसिक त्रास देत असल्याचे धानुरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच सरवणकर यांना आपल्या मर्जीतला विभागप्रमुख हवा असून राहूल शेवाळे यांच्याशी संपर्क न ठेवणारा विभागप्रमुख हवा असल्याचे धानुरकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे विभागप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. पक्षाची इतर कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.