Mumbai Stunt : मुंबई लोकलमधून स्टंट करणाऱ्या या अनेक तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आता मुंबईच्या रस्त्यांवर स्टंट करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांनी त्यांना सज्जड दम दिला आहे. पोलिसांच्या धाकानंतर या कृत्याची कबुलीही संबंधित तरुणाने व्हिडिओमार्फत दिली.

आरोपीने त्याच्या मित्रांबरोबर स्टंटचे काही व्हिडिओ काढले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करण्यात आले. बेस्ट बस स्टॉपच्या छतांवर धावणे, बाईक स्टंट करणे, वाहनांवर चढणे असे विविध स्टंट या व्हिडिओमध्ये दित आहेत. हा व्हिडिओ अखेर पोलिसांपर्यंतही पोहोचला. त्यामुळे आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला असून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आरोपीने आपले कृत्य कबूल केले असून आपले म्हणणेही दिले आहे. आरोपीचे म्हणणे आहे की तो चेंबूर येथे राहतो आणि ४ जून रोजी पहाटे ३ वाजता तो आणि त्याचे मित्र दक्षिण मुंबईत होते. सायकलवर स्टंट करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यामुळेच आझाद मैदान पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

https://twitter.com/MumbaiPolice/status/1823211260508619126

दरम्यान, मुंबईतील अन्य एका कारवाईत, ९ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत संपूर्ण शहरात ई-बाईक विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत ११७६ ई-बाईकवर कारवाई करण्यात आली आणि १ लाख ६३ हजार ४०० रुपये किमतीचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांच्या विशेष मोहिमेदरम्यान २९० ई-बाईक जप्त केल्या असून २२१ ई-बाईकवर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा >> Mumbai : मुंबई लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाने एक पाय आणि हात गमावला, मध्य रेल्वेने केलं ‘हे’ आवाहन

मुंबई लोकलमध्ये स्टंट करणाऱ्याने गमावला पाय

एका तरुणाचा शिवडी स्टेशनवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर याच महिन्यात व्हायरल झाला होता. मुंबई लोकल सुरु असताना हा तरुण लोकलला लटकून पाय घासत जातो आणि प्लॅटफॉर्म संपल्यावर लोकलमध्ये चढतो असं या व्हिडीओत दिसत होतं. या तरुणाचा शोध लागला आहे, दुसऱ्या एका स्टंटमध्ये या तरुणाला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे. त्यामुळे आता त्याने असे स्टंट करु नका असं आवाहन केलं आहे