मुंबई : या आठवड्यातही उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असून, मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १७ अंशाखाली नोंदले गेले. तेथे १६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईत उपनगरांत किमान तापमानात अधूनमधून घट होत आहे. उपनगरांत मागील तीन- चार दिवसांपासून किमान तापमान १८ ते २० अंशादरम्याम नोंदले जात आहे. त्यामध्ये मंगळवारी आणखी घट होऊन सांताक्रूझ केंद्रावर १६.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. नोव्हेंबर महिन्यात प्रथमच किमान तापमान १७ अंशाखाली गेले आहे. पुढील काही दिवस यामध्ये फार मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमानात घट झाली असली तरी कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिर आहे. कुलाबा येथे मंगळवारी २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या कमाल तापमानात सध्या चढ-उतार सुरू असून काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उपनगरातील किमान तापमानात आणखी घट
या आठवड्यातही उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असून, मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १७ अंशाखाली नोंदले गेले.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2024 at 19:40 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSतापमानTemperatureमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai NewsहिवाळाWinter
+ 1 More
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai suburban temperature declined mumbai print news css