मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक असेल. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गिकाकुठे : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंतपरिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. हेही वाचा.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींची संख्या अधिक हार्बर मार्गिका कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावरकधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - पनवेल/वाशी/बेलापूर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहील. तर, सीएसएमटी - वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील. बेलापूर / नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सेवा उपलब्ध असतील. हेही वाचा.राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना पश्चिम रेल्वे कुठे : बोरिवली - गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरकधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत बोरिवली - गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर, काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यासह हार्बर मार्गावरील अंधेरी - बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणतीही लोकल सेवा धावणार नाही.