मुंबई : वर्गात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ३८ वर्षीय शारीरिक शिक्षण विषय शिकवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पीडित मुलगी धावण्याचा सराव करत असताना आरोपी शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ वर्षांची पीडित मुलगी २७ डिसेंबरला शाळेत धावण्याचा सराव करीत होती. त्यावेळी शारीरिक शिक्षण विषय शिकवणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षकाने दरवाजाबाहेर डोकावून पाहिले. कोणी नसल्याचे समजल्यानंतर त्याने दरवाजा ओढून घेतला व पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नको असे त्याने दटावले. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. अखेर त्यांनी शुक्रवारी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

हेही वाचा – मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

हेही वाचा – झोपु प्राधिकरणाचे २०३० पर्यंत दहा लाख घरांचे लक्ष्य!

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संबंधित शिक्षकाविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर एक पथक आरोपी राहत असलेल्या परिसरात पाठवण्यात आले. त्यांनी संबंधित शिक्षकाला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.