लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार सुभाष किसन मोरे यांनी या निकालाला आव्हान देणारी याचिका केली आहे.

आणखी वाचा-धारावीतील ११ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

मुंबई शिक्षक मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर निवडून आले होते. मोरे यांनी याचिकेत अभ्यंकर हे अपात्र मतदारांची नोंदणी करून निवडून आल्याचा दावा केला आहे. तसेच, त्यांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. शिक्षक मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार केवळ माध्यमिक आणि त्यावरील वर्गांना शिकवणारे शिक्षक यांना आहे. असे असतानाही, अभ्यंकर यांनी विविध विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक शिक्षक, काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंदणी केली. तसेच, निवडणुकीत विजय मिळवला, असा दावाही मोरे यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai teachers constituency result challenged in court mumbai print news mrj