गेले तीन दिवस मुंबईकरांना गारठवणाऱ्या थंडीने माघार घेतल्यामुळे उतरलेला पारा बुधवारच्या तुलनेत आणखी चार अंश सेल्सिअसने वर चढल्याने थंडी कमी झाली आहे. मात्र हा बदल तात्पुरता असेल. कारण हिवाळ्यात तापमानात या प्रकारचे चढउतार होतच असतात.
 वादळी पावसामुळे सोमवारी तापमान अचानक १२ अंश सेल्सिअसवर उतरले. उत्तर भारतात आलेल्या थंडीचा प्रभाव राज्यातही दिसू लागला. पण, मंगळवारपासून पाऱ्याने उसळी मारण्यास सुरुवात केली. मंगळवारी मुंबईचे कमान तापमान १६.६ अंशांवर गेले होते तर हेच तापमान बुधवारी २१.८पर्यंत आले. अर्थात थंडीचा जोर ओसरल्यासारखे वाटत असले तरी तापमानातील चढउतार या काळात असेच होत राहतील. कधी थंडीने आघाडी घेतलेली तर कधी तापमानातील वाढीमुळे उकाडय़ाने असा अनुभव येत राहील, असे वेधशाळेतर्फे स्पष्ट करण्यात आले.