तापमानातील चढउतारांचा अनुभव घेत असलेल्या मुंबईकरांना शनिवारी पुन्हा तोच अनुभव आला. दुपारचे तापमान तब्बल ३२ अंश सेल्सिअसवर जात असताना रात्री सुटलेल्या गार वाऱ्यांनी पहाटेचे तापमान तीन mu06अंशांनी कमी केले आणि गेले काही दिवसांचा चढउतारांची मालिका कायम ठेवली.
मुंबईच्या भौगोलिक स्थानामुळे शहरात कमाल व किमान तापमानात फारसा फरक पडत नाही. समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव या ऋतूत कमी होतो व जमिनीवरून येत असलेल्या वाऱ्यांनुसार तापमापकातील पारा हेलकावे खाऊ लागतो. नेमका याच स्थितीचा अनुभव गेला आठवडाभर सुरू आहे. गुरुवारी या मोसमातील दुसऱ्या क्रमांकाचे किमान तापमानावर पारा गोठला आणि दुसऱ्या दिवशी तीन अंशांची उसळीही घेतली. पुन्हा शनिवारी पारा तीन अंश घसरला.  दुपारच्या उन्हातही टोकाचे बदल जाणवत आहेत. एखाद्या दिवशी दुपारी बोचरे वारे अनुभवायला येतात तर दुसऱ्या दिवशी वारे गायब झाल्याने उन्हाचा ताप होतो.

Story img Loader