मुंबईवर २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी ३१ जणांचे प्राण घेतले. जवळजवळ ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्यामध्ये ताज हॉटेलचं मोठं नुकसान झालं होतं. या दहशतवादी हल्ल्यामध्ये गेट वे ऑफ इंडिया जवळ असणाऱ्या ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा स्वत: तिथे पोहचले होते. मात्र हॉटेलमध्ये गोळीबार होत असल्याने रतन टाटा यांना सुरक्षारक्षकांनी आतमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेसंदर्भातील खुलासा स्वत: रतन टाटा यांनी केला आहे. नॅशनल जिओग्राफीच्या मेगा आयकॉन्सच्या दुसऱ्या पर्वामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी अनेक गोष्टींबद्दल पहिल्यांदाच खुसाला केला असून त्यामध्ये मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा ताजमध्ये गेल्यानंतरचा अनुभवही सांगितला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा