संदीप आचार्य

कुलाब्याचं नरिमन हाऊस असं नुसतं म्हटलं, तरी प्रत्येक मुंबईकराच्या डोळ्यांसमोर २६/११चा थरार उभा राहतो… या सहा मजली इमारतीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हे ज्युईश केंद्र चालविणाऱ्या गॅव्रिएल आणि गर्भवती रिव्का होल्त्झबर्ग या दाम्पत्यासह सहाजण ठार झाले होते. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशे त्यांच्याकडे काम करीत असलेल्या सॅण्ड्रा या भारतीय दाईच्या मदतीने आश्चर्यकारकरीत्या बचावला होता. अक्षरश: राखरांगोळी झालेल्या या इमारतीत आता २६/११च्या हल्ल्याचे मुंबईतील एकमेव स्मारक आणि संग्रहालय आकाराला येत आहे. आघाताचे आंतरिक शक्तीत रूपांतर करणे ही या नरिमन लाइटहाऊस स्मारकाची आणि संग्रहालयाची मध्यवर्ती कल्पना आहे.

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड

या इमारतीच्या टेरेसवर २६/११ च्या हल्ल्याची जणू स्मरणगाथा मांडली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे कोरलेल्या दगडी भिंतीवरून वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि बाजूच्या भिंतीवर ओळीने लावलेली हिरवी रोपटी या मृत्यूच्या छायेतही जिवंतपणा टिकवून ठेवतात. कोविडच्या टाळेबंदीमुळे या मजल्याच्या डागडुजीचे बरेच काम निघाले आहे. ते लवकरच हाती घेतले जाईल. दहशतवाद्यांनी बोटीतून मुंबईत केलेल्या शिरकावापासून मुंबईत त्या रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा चित्रमय प्रवासही येथे आपल्यासमोर उलगडला जातो. त्याखालच्या पाचव्या मजल्यावर रब्बाय आपल्या कुटुंबासहित राहात होते. ही जागा म्हणजे या हल्ल्यात सर्वात बेचिराख झालेली वास्तू आहे. बांधल्या जाणाऱ्या या स्मारकामध्ये खोल्यांची अंतर्गत रचना पूर्वीसारखी ठेवून या मजल्याची पुनर्रचना करण्याची योजना आकाराला येत आहे.

या मजल्यावर आल्याआल्याच समोरच्या भिंतीवर होल्ट्जबर्ग कुटुंबाची ओळख होईल, तिथल्या हल्ल्याची कथाही वाचायला मिळेल. या मजल्यावर ज्यू जीवनपद्धती आणि परंपरेतील सांस्कृतिक घटकांचे चित्रण केले जाणार आहे. येथे फेरफटका मारताना- मोशेच्या खोलीतील हिब्रू भाषेत लिहिलेले त्याचे नाव आणि त्याच्याकरता आईबाबांनी लिहिलेली बाराखडी पाहून मनात कालवाकालव होते. दोन वर्षांच्या इवल्याशा मोशेची उंची मोजल्याची भिंतीवरची खूण पाहून गलबलायला होते. इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या २०१८ सालच्या भारतभेटीच्या वेळेस, त्यांच्यासोबत थोडा मोठा झालेला मोशेही सोबत आला होता. तेव्हा पंतप्रधानांनी याच भिंतीवर पुन्हा एकदा त्याची उंची मोजून खूण केली, ती खूणही आपल्याला दिसते. या साऱ्या खुणा जतन करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

चौथ्या मजल्याची रचना ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ या संकल्पनेवर आधारित आहे. हल्ल्यात चाळण झालेल्या नरिमन हाऊसपासून जागतिक दहशतवादापर्यंत आणि मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यापासून आशेच्या प्रकाशमय किरणांपर्यंत नेणारा हा अनुभव असेल. या मजल्याला भेट देताना अंधुक प्रकाशातून आपला प्रवास सुरू होईल. प्रकाशाच्या नाट्यमय खेळाने आपल्यासमोर दृक्-श्राव्य चित्रफीत उलगडत जाईल. दु:खाच्या सार्वत्रिक धाग्याने परस्परसंबंध कसा विणला जातो, याचा अजोड अनुभव देताना- अंधाराकडून प्रकाशाच्या कोवळ्या किरणांपर्यंत नेणारा हा प्रवास असेल, अशी याची रचना आहे.

नरिमन लाइटहाऊसला भेट देणाऱ्यांचे मनापासून स्वागत करणारा स्वागतकक्ष उभारला जात आहे. या कक्षात जाणीवपूर्वक हिरवाई राखण्यात आली आहे. छाबड हाऊसचे ध्येय, कार्य, चळवळ याची माहिती मिळू शकेल. हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या या नरिमन लाइटहाऊसचा कायापालट करून या स्मारकाद्वारे आणि संग्रहालयाद्वारे जगातील चांगुलपणावरचा सर्वांचा विश्वास वृद्धिंगत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे छाबड हाऊसचे संचालक इस्रायल कोझ्लोव्हस्की यांनी सांगितले. त्याचसोबत ‘येथे विद्यार्थ्यांकरता नैतिक मूल्यविषयक कार्यकाळा-प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातील. स्वयंसेवी संस्थांसमवेत विविध प्रकल्प राबवण्याचाही आमचा मानस असून येथे बांधलेल्या ‘प्रॉमिस वॉल’वर आपले संकल्प लिहिण्यास अभ्यागतांना प्रेरित केले जाईल, असेही कोझ्लोव्हस्की यांनी सांगितले.

विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

कुलाब्याच्या नरिमन हाऊसमध्ये आकाराला येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाला आणि संग्रहालयाला भेट दिल्यानंतर प्रत्येकजण आतून हलेल, याची ग्वाही नरिमन हाऊसचे खजिनदार डॉ. खेन जेकब नागावकर यांनी दिली. मुंबईवरच्या हल्ल्याचे सर्वसमावेशक स्मारक निर्माण करण्यासाठी या हल्ल्याची धग अनुभवलेले नरिमन हाऊस सरसावले असताना मुंबईवर अतोनात प्रेम करणाऱ्या प्रत्येक मुंबईकराने आपला खारीचा वाटा उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले. अधिक माहितीकरता व या स्मारकाला- संग्रहालयाला मदत करण्याकरता डॉ. खेन जेकब नागावकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा– ९८२०१४३६८१ असेही त्यांनी सांगितले.