मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत काल सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळला. चोवीस तासांत २०० मिमी पावासाची नोंद झाली आहे. शिवाय, आजही मुसळधार पाऊस होणार असून, पुढील तीन तास मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याचाही हवामान खात्याने इशारा दिला आहे.
मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते.
Mumbai, Thane, NM realized extremely heavy rainfall (>200mm) in last 24 Hrs. Models r indicating that the heavy RF to continue today.
Entire west coast too.
मुंबई, ठाणे, एनएम येथे गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस (> २०० मिमी) झाला. मॉडेल्स दर्शवित आहेत की भारी RF आजही सुरू राहील. pic.twitter.com/oZEcEhnfXn— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2020
रायगड जिल्ह्यात २४ तासांत 149.44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. श्रीवर्धन- 239 मिमी, पनवेल- 210 मिमी, उरण – 215 मिमी, माथेरान-209 मिमी, म्हसळा-215 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार आणि अतिवृष्टी म्हणजे किती पाऊस? –
Heavy Rainfall – मुसळधार – 65 ते 115 मिमी
Heavy to Very Heavy – मुसळधार ते अतिमुसळधार – 115 ते 200 मिमी
Extremely Heavy – अतितीव्र मुसळधार/अतिवृष्टी – 200 मिमी पेक्षा अधिक