मुंबई : वडिलांसोबत बाजारात गेलेल्या एका १० वर्षीय मुलीला शाळेच्या मोटारगाडीने धडक दिल्याची घटना १२ दिवसांपूर्वी मानखुर्द परिसरात घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

मीनाक्षी बाहेरा (१०) असे या जखमी मुलीचे नाव असून ती मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात वास्तव्यास होती. ती वडिलांसोबत २९ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास येथील मासळी बाजारात मासे घेण्यासाठी गेली होती. यावेळी भरधाव वेगात आलेल्या शाळेच्या मोटारगाडीने तिला धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिच्या वडिलांनी तात्काळ तिला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले १२ दिवस शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. या मुलीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Elderly woman commits suicide in Mulund
मुंबई : मुलुंडमध्ये वृद्ध महिलेची आत्महत्या
pune satara highway accident marathi news
मुंबई: मुलुंडमध्ये हिट अँड रन, एकाचा मृत्यू
speeding suv kills 27 year old pedestrian woman in malad
Mumbai Accident : मालाड येथे मोटरगाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Mumbai, boy died while playing,
मुंबई : शाळेत खेळताना आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
divorced woman commits suicide by jumping from building balcony in kalyan
कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या
Girls Found Hanging in uttar pradesh
Crime News : धक्कादायक! जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी गेल्या अन् दुसऱ्या दिवशी झाडावर आढळले मृतदेह, दोन मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ

हेही वाचा – माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप

हेही वाचा – तीन दिवस मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक चार तास बंद राहणार

घटनेनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. मात्र त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला होता. मीनाक्षीचा मृत्यू झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले असून चालकाविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.