मुंबई : रिक्षाने घरी जात असलेल्या एका महिलेच्या हातातील मोबाइल हिसकावून चोरांनी दुचाकीवरून पोबारा केल्याची घटना शनिवारी मुलुंड परिसरात घडली. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा – पश्चिम रेल्वे विस्कळित झाल्याने मेट्रोची अतिरिक्त ट्रेन सेवा
तक्रारदार महिला ऐरोली परिसरात वास्तव्यास असून त्या वरळी येथे काम करतात. त्या शनिवारी रात्री मुलुंड येथून ऐरोलीच्या दिशेने रिक्षाने जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिक्षातून जात असलेल्या तक्रारदार महिलेच्या हातावर फटका मारून त्यांचा ॲपल कंपनीचा मोबाइल हिसकावून पळ काढला. महिलेने रिक्षा चालकाच्या मदतीने बराच वेळ सदर दुचाकीचा पाठलाग केला. मात्र चोरांनी पोबारा केला. याप्रकरणी महिलेने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.