मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांवर संध्याकाळपर्यंत झालेली गर्दी टाळण्यासाठी यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून प्रायोगिक तत्वावर गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईत तब्बल साडेसहाशे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावरील मतदारांची गैरसोयही टळणार आहेच, पण मुंबईतील मतदानाचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांमुळे मतदारांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले होते. एकेका मतदान केंद्रावर जास्त संख्येने मतदार असल्यामुळे मतदानाची वेळही वाढवावी लागली होती. अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियोजनावर खूप टीका झाली होती. यावेळी खबरदारी घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी दीड हजार मतदारांची संख्या आता सरासरी एक हजार ते १२०० पर्यंत असेल. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे. यावेळी मुंबईतील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ इतकी आहे. तसेच यावेळी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. यावेळी तब्बल साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा…मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

निवडणूक आयोगाला मतदान केंद्रासाठी जागा ताब्यात घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र तरीही ज्या गृहनिर्माण संस्थांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे त्याच ठिकाणी मतदान केंद्रे उभारले आहे. अन्यथा मुंबईत अनेक शाळा असून त्यात मतदान केंद्रे उभारली आहेत. मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सोसाव्या लागलेल्या उन्हाच्या झळा यावेळी टळतील. त्यामुळे मतदारांच्या सोयीसाठी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे. याकरीता सूक्ष्म नियोजन केले असून त्याचा मतदान वाढीसाठी चांगला फायदा होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

५०० पेक्षा जास्त सदस्य असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये केंद्र

मोठ्या गृहनिर्माण संस्था किंवा गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पाचशेपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संकुलांमध्ये ही केंद्रे आहेत. ज्या गृहनिर्माण संस्थांंनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे अशा संस्थांमध्येच ही केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवडणूक समन्वयक फरोग मुकादम यांनी दिली. अशा सोसायट्यांमधील मोकळ्या जागेत किंवा वाहनतळाच्या ठिकाणी ही केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. अशा सोसायट्यांमध्ये शक्यतो ९० टक्के मतदार हे त्या सोसायटीतील असतील.

हेही वाचा…मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च

एकूण मतदान केंद्र

उपनगर … ७५७४

शहर …२५३७

उपनगर जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील मतदान केंद्र उपनगर…५५३

शहर …१००

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai this election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding mumbai print news sud 02