मुंबईः मुंंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी) आरडीएक्स ठेवणार असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. त्या घटनेनंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून याप्रकरणी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास हा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने काही वेळातच सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. घटनास्थळी श्वान पथके व इतर यंत्रणा पाठवून तपासणी करण्यात आली. पण काही संशयास्पद सापडलेले नाही. याप्रकरणी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Suspect related to Babbar Khalsa arrested from Mumbai NIA takes action
बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप
akhil bharatiya marathi sahitya sammelan 2024 delhi, swatantrya veer savarkar, nathuram godse
संमेलनस्थळाला गोडसेचे नाव देण्यासाठी धमक्या, साहित्य संमेलन आयोजक संस्थेचे संजय नहार यांचा दावा
Image of Sanjay Raut.
Sanjay Raut House : संजय राऊत यांच्या घराच्या रेकी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी माहिती, “यामध्ये आढळलेले चार इसम…”
mumbai cyber crime police officer
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात आता पोलीस अधिकारी
ACB arrested Municipal Corporation officer Mandar Tari for demanding two crore bribe
लाच मागितल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक
Sharmila Tagore
जमावाकडून चिखलफेक, ट्रेनला आग लावण्याची धमकी अन्…; शर्मिला टागोर यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग

हेही वाचा – Worli Hit and Run Case : वरळीतील हिट अँड रन प्रकरणी ट्विस्ट; मिहीर शाहचा रक्त तपासणी अहवाल आला समोर, पोलीस म्हणाले…

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दूरध्वनी मध्य प्रदेशातील एका मनोरुग्णाने केल्याचे नुकतेच उघड झाले होते. पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामांसह बॉम्ब व दहशतवादी हल्ल्यांच्या खोट्या दूरध्वनी व अफवांनाही समोरे जावे लागत आहे. मुंबई पोलिसांना दर महिन्याला सरासरी ५ ते ७ खोटी माहिती देणारे दूरध्वनी अथवा संदेश येत आहेत. गेल्या सात महिन्यांत मुंबई पोलिसांना सुमारे ३५ अफवा अथवा धमकीचे दूरध्वनी अथवा संदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात.

मुंबई पोलिसांना दूरध्वनी, ई-मेल आणि समाज माध्यमांवर बॉम्ब अथवा दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर कार्यपद्धतीनुसार तात्काळ संबंधित यंत्रणांना याबाबतची माहिती दिली जाते. त्यासाठी घटनास्थळावर श्वान पथक, बॉम्ब शोध व नाशक पथक पाठवण्यात येते. तसेच त्या ठिकाणी बंदोबस्तही ठेवावा लागतो. तपासणीत काहीही संशयास्पद सापडले नाही, तर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातो. गुन्हे शाखेचे गुप्तवार्ता विभाग विशेष करून अशा व्यक्तींचा तपास करते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – मुंबईच्या ३६ मतदारसंघात काँग्रेसची ‘न्याय यात्रा’

गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत ३५ दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नात बॉम्ब असल्याचे ट्वीट करणाऱ्याला नुकतीच मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. हे ट्वीट १३ जुलैला करण्यात आले होते. दरम्यान, सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली होती. याप्रकरणी विरल आसरा याला अटक करण्यात आली होती. तो खासगी कंपनीत कामाला आहे. आरोपी आयटी इंजिनीयर होता. तर १३ मेला एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून असलम अली कराची, पाकिस्तानमधून ३५० किलो आरडीएक्स घेऊन मुंबईत आला आहे. तो महालक्ष्मी, विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानाकांवर आरडीएक्स ठेवणार असल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. हा दूरध्वनीही खोटा होता.

Story img Loader