दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. या लोकल मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि बऱ्याचदा प्रवाशांचे टीसीसोबत होणारे वाद लक्षात घेता मध्य रेल्वेनं टीसीच्या (तिकीट कलेक्टर) गणवेशावर बॉडी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीच्या शर्ट/कोटावर हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगसह ऑडिओ देखील रेकॉर्ड होणार आहे. तसेच या कॅमेराने रेकॉर्ड केलेले ऑडिओ/व्हिडिओ ३० दिवस सेव्ह करून ठेवता येणार आहेत. त्यामुळे प्रवासी आणि टीसी यांच्यात होणारे वाद, संभाषणं तसेच रेल्वे आणि फलाटांवर घडणाऱ्या घडामोडी रेकॉर्ड होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकंदरित सुरळीत आणि पारदर्शक तिकीट तपासणीसाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे पुढील आठवड्यापासून मुंबई विभागातील २४ स्थानकांवर तिकीट तपासनीसांना (टीसी) बॉडी कॅमेरे उपलब्ध करून देणार आहे. या २४ रेल्वे स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेने मे महिन्यात घोषणा केली होती की, टीसींना एकूण ५० कॅमेरे उपलब्ध करून दिले जातील. परंतु एका कॅमेऱ्यामुळे त्यास उशीर झाला, अखेर ४९ बॉडी कॅमेरे विभागाला मिळाले आहेत. या कॅमेऱ्यांसह टीसींना पारदर्शक कव्हर होल्डर दिले जातील. तसेच या कव्हरवर प्रवशांसाठी मेसेज असेल की, तुम्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आहात

या कॅमेऱ्यांमुळे प्रवाशांचे टीसीबरोबरचे गैरवर्तन थांबेल, तसेच तिकीट तपासणीदरम्यान कुठलीही गडबड होणार नाही. हे हाय रेझॉल्यूशनवाले कॅमेरे आहेत, तसेच हे कॅमेरे अंधारातही शूटिंग करू शकतात. यात मोशन डिटेक्शन फीचर आहे. हे ५० कॅमेरे २४ स्थानकांवरील टीसींना आलटून-पालटून दिले जातील. हे कॅमेरे किती उपयोगी पडतात, तसेच त्याला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहून अधिक कॅमेरे मागवले जातील, असं रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

हे ही वाचा >> “अजित पवारांनी ‘ती’ यादी लवकरच जाहीर करावी”, संजय राऊतांचं विधान; म्हणाले, “आमच्याकडेही…!”

मे महिन्यात १४.५० कोटींची दंड वसुली

रेल्वेच्या मुंबई विभागाने केवळ मे महिन्यात वैध तिकीट नसलेल्या किंवा विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १४.५० कोटी रुपये इतका दंड वसूल केला आहे. तसेच तब्बल २.६ लाख गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.