Mumbai TISS Student Dead : मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या संस्थेमधील एका २९ वर्षीय विद्यार्थ्याचा मुंबईतील चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला आहे. हा विद्यार्थी एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे यासंदर्भात पोलिसांकडून तापास सुरू करण्यात आला आहे. या विद्यार्थ्याचं नाव अनुराग जैस्वाल असं आहे.

अनुराग जैस्वाल हा विद्यार्थी टीआयएसएस येथे मानव संसाधन कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो मूळ लखनौ येथील असल्याची माहिती मिळत आहे. अनुराग जैस्वाल हा शुक्रवारी रात्री मुंबईतील वाशी येथे एका पार्टीला गेला होता. त्या ठिकाणी १०० पेक्षा जास्त विद्यार्थीही उपस्थित होते, असं इंडिया टु़डेनी एका वृत्तात म्हटलं आहे.

One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
Golden fox dead in Kharghar, Golden fox, Kharghar,
खारघरमध्ये सुवर्ण कोल्हा मृतावस्थेत
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

हेही वाचा : बेकरीजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका; भंगारातील फर्निचरमधून उत्सर्जित होणारी रसायने आणि वायू हानिकारक

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पार्टीवरून आल्यानंतर अनुराग जैस्वाल हा शनिवारी सकाळी उठला नाही. त्यामुळे त्याचे मित्रही घाबरले. त्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी चेंबूर येथील एका स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच या संदर्भात पुढील चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान, अनुराग जैस्वालचे कुटुंबीय आल्यानंतर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे. अनुराग जैस्वाल हा पार्टीत गेला होता, त्यामुळे त्याने मद्यप्राशन केले होते का? तसेच त्याच्याबरोबर रॅगिंगचा काही प्रकार झाला आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.