मुंबई : बदलापुरमध्ये दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी दिलेली महाराष्ट्र बंदची हाक, चेहलम, कृष्णजन्म व गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाच दिवस पाच दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून कोणताही अुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

विरोधकांनी बंदची हाक दिल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पातळीवर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र बंद, चेहलम, कृष्णजन्म व गोपाळकाला याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान पाच दिवस विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वत्र नाकाबंदी व शोधमोहीम राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी खेळाडू, विशेष शाखा, पोलीस दवाखाना, कॅन्टीन अशा ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या पोलिसांनाही बंदोबस्तासाठी तैनात करण्याची सूचना करण्यात आली होती. राज्य राखीव पोलीस दल, शीघ्रकृती दल, दंगल विरोधी पथकाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

हेही वाचा…मुंबई आणि ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

रास्ता रोको व रेल रोकोचे प्रकार टाळण्यासाठी विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. रेल्वे पोलिसही त्या अनुषंगाने बंदोबस्त ठेवणार आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अनेक स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यत सुरूवात केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक विरोधी पक्षांनी बंदची हाक मागे घेतली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader