पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या अलिबागला मुंबईहुन केवळ ४० मिनिटांत पोहचणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून मुंबई-मांडवादरम्यान २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी धावणार आहे.
हेही वाचा- मध्य रेल्वेवर तीन हजार नव्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर; प्रवाशांची सुरक्षा होणार अधिक भक्कम
मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सध्या भाऊचा धक्का येथून रो रो सेवा सुरू आहे. रो रोने अलिबागला पोहचण्यासाठी ६० ते ७० मिनिटे लागतात. मात्र हा प्रवास आणखी जलद गतीने पार करण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या सेवेसाठी प्रवाशांना ४०० आणि ४५० रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्णतः वातानुकूलित अशा या टॅक्सीच्या ६ फेऱ्या दिवसाला होणार आहेत. दरम्यान बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया अशी वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा- आरेत आणखी एक बिबट्या जेरबंद; ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरु होता शोध
मुंबई क्रूझ टर्मिनल येथून सकाळी १०.३० वाजता, दुपारी १२.५० वाजता आणि दुपारी ३.१० वाजता बोट सुटेल. मांडवा येथून दुपारी ११.४० वाजता, दुपारी २.०० वाजता आणि दुपारी ४.२० मिनिटांनी बोट सुटेल.