मुंबई : वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागातील नागरिकांसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने नागरी सुविधा केंद्रात टोकन प्रणाली सुरू केली आहे. नागरिकांना या ठिकाणी विविध कामांसाठी रांग लावायला लागू नये म्हणून जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ही सोय उपलब्ध करून दिली आहे.

पालिकेच्या विभाग कार्यालयातील नगारी सुविधा केंद्रात नागरिक विविध कामांसाठी येत असतात. मालमत्ता कर, जलकर भरणे, जन्म व मृत्यू दाखला व विविध चलनाचा भरणा यासह इतर कामांसाठी रहिवासी नियमितपणे विभाग कार्यालयांत येत असतात. त्यांना देयकाचा भरणा करण्याकरिता बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. तसेच आपल्या कामासाठी किती वेळ लागेल हे नागरिकांना समजू शकत नाही. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे रहायला लागू नये तसेच त्यांना त्याकरिता किती वेळ लागेल हे समजावे याकरीता जी दक्षिण विभागाने टोकन प्रणाली सुरू केली आहे. तसेच या विभाग कार्यालयात स्तनदा मातांना स्तनपानाकरिता हिरकणी कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

हेही वाचा – सायबर फसवणुकीतील ४ कोटी ६५ लाख वाचवण्यात पोलिसांना यश, सिम स्वॅपिंगद्वारे खात्यातून साडेसात कोटी काढले होते

हेही वाचा – नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग आठवडाभरापासून बंद

जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदूला अंडे यांनी याबाबत सांगितले की, नागरिकांचा वेळ वाचावा याकरीता व रांगेचे नियमन करण्याकरिता टोकन प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. मुंबईकर हे घड्याळ्याचा काट्यावर धावत असतात. रांग लावण्याइतका वेळ मुंबईकरांकडे नसतो. त्यामुळे नागरिकांना आपल्या वेळेचे नियोजन करता यावे याकरीता ही सुविधा देण्यात आली आहे. मुंबईतील २६ विभाग कार्यालयांमध्ये सर्वप्रमथम ही सुविधा वरळी, प्रभादेवीत देण्यात आली आहे.

Story img Loader