मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्याच्या आठवणी अजूनही या शहरातील नागरिकांच्या मनात ताज्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आली आहे. या धमकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तातडीने भारतीय दंडविधानाच्या कलम ५०९(२) नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगी सरकार व मोदी सरकारचा उल्लेख!
दरम्यान, या फोन कॉलमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या दोन्ही सरकारांना लक्ष्य करणार असल्याचं धमकीत म्हटलं आहे. पोलिसांनी यासंदर्भात तातडीने तपास चालू केला आहे.