मुंबई : ई-चलनच्या थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लोक अदालतमध्ये धाव घेतल्यानंतर २ लाख ३० हजार ई-चलनवरील थकीत १६ कोटी २६ लाख रुपयांचा दंड चालकांनी भरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोक अदालतच्या सुनावणीपूर्वी शहरातील अनेक थकीत वाहनचालकांना नोटीस बजावून थकीत दंड भरण्यास सांगण्यात आले होते. २०१९ मध्ये वाहतूक पोलिसांनीही ई-चलन यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यातील थकीत रक्कम वाढल्यामुळे वाहतूक पोलिसांनी संबंधित चालकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वाहतूक पोलिसांचे कर्मचारी या चालकांच्या घरीही जाऊन चालकांना दंडाची रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यानंतरही अनेक वाहनचालकांनी दंडाची रक्कम न भरल्यामुळे वाहतूक पोलिसांनी एक पाऊल पुढे जाऊन याप्रकरणी लोक अदालतमध्ये धाव घेतली होती.

हेही वाचा…राज्यातील साडेदहा हजारांहून अधिक गृहप्रकल्पांवर कारवाईची टांगती तलवार

दरम्यान, १४ डिसेंबरला लोक अदालत झाली होती. प्रलंबित दंडाची रक्कम भरण्यासाठी चालकांना मोबाइलवर संदेश पाठवण्यात आले होते. यावेळी लोकअदालतमध्ये दोन लाख ३० हजार १७५ प्रलंबित ई-चलनांची एकूण १७ कोटी २७ लाख ७० हजार २५० एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai traffic police collected fine of 16 crore 26 lakhs after running to lok adalat mumbai print news sud 02