मुंबईतील गोरेगाव येथे एका ४९ वर्षीय पीएचडी धारकाचा मृत्यू झाला आहे. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. रवी यादव असे मृताचे नाव अून ते मुळचे डोंबिवलीचे आहेत. ते एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीत कामाला होते. त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर सोसायटी, म्हाडा कॉलनी येथे २४ जून रोजी यादव यांचा मृतदेह त्यांच्या मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो या मैत्रिणीबरोबर कधीतरी राहत असे. तिने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तो नेहमीप्रमाणे राहण्यासाठी तिच्या फ्लॅटवर आला. रात्री ११ वाजेपर्यंत ती दुसऱ्या खोलीत होती. नंतर हॉलमध्ये प्रवेश केल्यावर तिला यादव ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले.

हेही वाचा >> “मिंधेंचा BEST बससेवा संपवण्याचा डाव, अर्थसहाय्य मिळालंच पाहिजे”, आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या चार मागण्या

तिने पोलिसांना सांगितले की तिने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओढणीचा दोर सैल झाल्याने मृतदेह जमिनीवर पडला, त्यामुळे रक्तस्त्राव झाला. दरम्यान, दुसऱ्या शेजाऱ्याने सोसायटीच्या चेअरमनला याची माहिती दिली, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

आत्महत्येचं कारण काय?

पोलिसांना यादवच्या शरीरावर लटकलेला फास सापडला आहे. हा फास पोस्टमॉर्टम तपासणीसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. मंगळवारी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.