मुंबई : महिन्याभरापूर्वी मुलुंडमध्ये वृद्धाला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना उल्हासनगर येथून अटक केली.

मुलुंड परिसरात वास्तव्यास असलेले ८० वर्षांचे वृद्ध १३ मार्च रोजी एलबीएस मार्गावरून जात होते. त्यावेळी त्यांना दोघांनी अडवले. या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून त्यांच्या बोटातील चार अंगठ्या आणि एक सोनसाखळी लंपास केली. काही वेळानंतर जैन यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

mahayuti vs maha vikas aghadi checking numerical strength before maharashtra vidhan sabha election 2024 results
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : युती-आघाडीकडून निकालापूर्वी संख्याबळाची चाचपणी
PET and LLM entrance exams from Dombivli centre now at two centres
डोंबिवलीच्या केंद्रावरील ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा आता…
Ministry clerk assault case Bachchu Kadu acquitted
मंत्रालयातील लिपिकाला मारहाणीचे प्रकरण : बच्चू कडू यांची निर्दोष सुटका
Block on Central Railway line on Sunday
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक
Wife withdraws consent for mutual divorce is not reason to quash crime of cruelty
परस्पर सहमतीच्या घटस्फोटासाठी दिलेली संमती पत्नीकडून मागे? हे क्रूरतेचा गुन्हा रद्द करण्याचे कारण नाही
Female patient jumps from sixth floor at Cooper Hospital
कूपर रुग्णालयात महिला रुग्णाने मारली सहाव्या मजल्यावरून उडी
Baba Siddique case man arrested for transferring money to accuseds account
बाबा सिद्दीकी प्रकरण : आरोपींच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करणाऱ्याला अटक
Tilak Nagar police car was hit by suddenly stopped container while patrolling Chheda Nagar
घाटकोपरमध्ये मोटारगाडीच्या अपघातात दोन पोलीस जखमी
Netravati Express run from central and Konkan Railway to Panvel then Thiruvananthapuram
कोकण रेल्वेवरील एक रेल्वेगाडी पनवेलपर्यंतच

हेही वाचा – वडाळ्यातील किराणा दुकानाला भीषण आग, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात वृद्धाचा मृत्यू

हेही वाचा – मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल

परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. या आरोपींना उल्हासनगर पोलीस ठाण्याने अशाच एका गुन्ह्यात अटक केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रमेश जैस्वाल (४७) आणि अनिल शेट्टी (४३) या दोघांचा ताबा घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.