मुंबई : महिन्याभरापूर्वी मुलुंडमध्ये वृद्धाला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने लुटल्याची घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना उल्हासनगर येथून अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलुंड परिसरात वास्तव्यास असलेले ८० वर्षांचे वृद्ध १३ मार्च रोजी एलबीएस मार्गावरून जात होते. त्यावेळी त्यांना दोघांनी अडवले. या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून त्यांच्या बोटातील चार अंगठ्या आणि एक सोनसाखळी लंपास केली. काही वेळानंतर जैन यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हेही वाचा – वडाळ्यातील किराणा दुकानाला भीषण आग, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात वृद्धाचा मृत्यू

हेही वाचा – मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल

परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. या आरोपींना उल्हासनगर पोलीस ठाण्याने अशाच एका गुन्ह्यात अटक केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रमेश जैस्वाल (४७) आणि अनिल शेट्टी (४३) या दोघांचा ताबा घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai two arrested for robbing old man gold mumbai print news ssb
Show comments