कोडीयन अमलीपदार्थ मिश्रीत खोकल्यावरील औषधाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी अंमलीपदार्थ मिश्रीत खोकल्याच्या औषधाच्या २० बाटल्या जप्त केल्या असून पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत.गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात बुधवारी रात्री दोन इसम संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळले.
हेही वाचा >>> दसऱ्याला शिवाजी पार्क सुनेसुने राहणार ? शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाकारण्याची शक्यता
पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याजवळ कोडीयन अमलीपदार्थ मिश्रीत खोकल्याच्या औषधाच्या २० बाटल्या सापडल्या. त्याचा नशेसाठी वापर होत असल्याने पोलिसांनी दोघाना ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. झाकीर इंद्रिसी (२२) आणि शहानवाज खान (३१) अशी या आरोपींची नावे असून अंमलीपदार्थ मिश्रीत खोकल्याचे औषध आरोपींनी कुठून आणले याबाबत शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.