मुंबई : दक्षिण मुंबईमधील चिराबाजार परिसरात सोमवारी संरक्षक भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

चिराबाजारमधील दादीशेठ अग्यारी लेन येथील गांधी इमारतीच्या परिसरात ही दुर्घटना घडली. या इमारतीची सुमारे पाच ते सात फुट उंच संरक्षक भिंत अचानक शेजारच्या घरगल्लीवर पडली. ३० फूट लांब भिंतीचा काही भाग चिंचोळ्या घरगल्लीवर पडल्यानंतर रहिवाशांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला कळवली. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. तसेच हा संपूर्ण परिसर पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. या दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले. या कामगारांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन कामगारांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अन्य एक कामगार जखमी आहे.

हेही वाचा – मुंबई – ठाण्यात लाखमोलाच्या दहीहंड्या

हेही वाचा – मुंबई : अटल सेतूवरून ५० लाख वाहने धावली, सात महिन्यांत गाठला ५० लाखांचा टप्पा

विजयकुमार निषाद (३०) आणि रामचंद्र सहानी (३०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर सन्नी कनोजिया (१९) हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

Story img Loader