मुंबई : मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच घरांसाठी शुक्रवार, ३ जानेवारीपर्यंत अनामत रक्कमेसह १७ हजार ७३ अर्ज दाखल झाले आहेत. आता अर्जविक्रीसाठी अर्थात इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. सोमवारी रात्री ११.५९ वाजता अर्जविक्रीची मुदत संपणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत किती अर्ज दाखल होतात याकडे आता कोकण मंडळाचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण मंडळाने २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेली ११७ घरे अशा एकूण २,२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत १० डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होती. मात्र ९ डिसेंबरपर्यंत अनामत रक्कमेसह अंदाजे पाच हजार अर्ज सादर झाल्याने अर्ज विक्री – स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार या प्रक्रियेला २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या मुदतवाढीमुळे २७ डिसेंबरची सोडत २१ जानेवारीवर गेली. दरम्यान मुदतवाढवूनही सोडतीला प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १३ हजार अर्ज आल्याने अर्जविक्री-स्वीकृतीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. अर्जविक्रीसाठी ६ जानेवारी तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी ७ जानेवारी अशी मुदत निश्चित करण्यात आली. आता अर्जविक्रीची, अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक राहिले आहेत. सोमवारी रात्री ११.५९ मिनिटांनी ही मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरा करत अर्ज सादर करावेत असे आवाहन कोकण मंडळाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा…नियोजन प्राधिकरणांचे काम कंपनीच्या धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला निर्देश

दोनदा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. कारण ११ आॅक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरु झाली असातनाही आतापर्यंत, ३ जानेवारीपर्यंत २२६४ घरांसाठी केवळ २७ हजार १११ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यातील १७ हजार ०७३ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. अनामत रक्कमेसह सादर झालेले अर्जदार सोडतीत सहभागी होतात. त्यामुळे २२६४ घरांसाठी १७ हजार अर्ज ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे हा प्रतिसाद अत्यल्प समजला जात आहे. आता अर्जविक्री-स्वीकृीतीची मुदत संपुष्टात येईपर्यंत नेमके किती अर्ज सादर होतात त्याकडे कोकण मंडळाचे लक्ष लागले आहे. याबाबतचे चित्र 8 जानेवारीला स्पष्ट होईल. मात्र सोडतीचा आतापर्यंतचा प्रतिसाद पाहता अनामत रक्कमेसह दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या २० हजारांच्या आत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान सोडतीला अत्यल्प प्रतिसाद असल्याने पुन्हा सोडतीला मुदतवाढ देणार का याविषयी मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai two deadline extensions 17073 applications filed by january 3 for mhada konkan mandals lottery of 2264 houses mumbai print news sud 02