मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना सोने तस्करीप्रकरणी मुंबई विमानतळावर अटक केली. त्यांच्याकडून २१ किलो २८८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत १८ कोटी ९२ लाख रुपये आहे.

दोन्ही प्रवाशांनी विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या कमरेच्या पट्ट्यात सोने लपवले होते. संबंधित प्रवाशांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान आरोपींकडील कमरेच्या पट्ट्यात परदेशी शिक्के असलेले २१ सोन्याचे बार सापडले. चौकशीदरम्यान आरोपी सोन्याच्या तस्करीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, त्यांच्याकडून तब्बल १८ कोटी ९२ लाख रुपये किमतीचे २१ किलो २८८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत या दोन्ही प्रवाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader