मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सोमवारपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट ३ अॅप कार्यान्वित केले आहे. या अॅपद्वारे प्रवाशांना आरे ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांची, स्थानकातील सोयीसुविधांची आणि इतर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अॅप इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे.

District administration issues notice to organizers regarding children attending Coldplay concert navi Mumbai news
कोल्डप्ले संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर निर्बंध; जिल्हा प्रशासनाकडून आयोजकांना सूचना
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MMRDA Contractors given extension for work on Metro 9 and Metro 7A lines Mumbai news
‘मेट्रो ९’ आणि ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकांच्या कामाला मुदतवाढ; मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार
total of 1 thousand 415 kilometers cycled from Delhi to Mumbai by Feet Bharat Club of HSNC University
‘एचएसएनसी’ विद्यापीठाची सायकलद्वारे भारत भ्रमंती
NHSRCL is working on Mumbai Ahmedabad bullet train project
बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर
Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
underground Ulhasnagars old electricity system is fulfilled with 16 84 crore funding approved
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती

हेही वाचा : Anushakti Nagar Assembly constituency : उमेदवारीवरून महायुतीत सावळागोंधळ? मविआतही चुरस; पुन्हा मलिक विरुद्ध काते सामना?

जवळचे मेट्रो स्थानक कोणते आहे, तिकीट दर किती, गाड्यांचे वेळापत्रक यांसह अन्य सर्व प्रकारची माहिती या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या तक्रारी या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहेत. या तक्रारींचे निवारणही अॅपद्वारे केले जाणार आहे. मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे का, याचीही माहिती या अॅपद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. याबरोबरच ‘एमएमआरसीएल’ने क्यूआर कोड स्कॅनिंग तिकीट, ई तिकीट सेवेसह ईव्हीएम मशीनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा : Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : सपाच्या अबू आझमींसमोर महायुतीचा निभाव लागणार का?

प्रतिसादाची अपेक्षा

पहिल्या भुयारी मेट्रो प्रवासासाठी मुंबईकर उत्सुक असल्याने सोमवारी बीकेसी आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता होत आहे. या मेट्रोला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader