मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांची गुणवत्ता यादी आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालये गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> करचुकवेगिरीची सुपारी; दहा दिवसांत १५ कोटींचा ऐवज जप्त

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यंदा २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ अर्ज केले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) १४ जूनपासून २० जूनला दुपारी ३ वाजेपर्यंत होईल. विद्याशाखानिहाय सादर केलेल्या प्रवेश अर्जामध्ये सर्वाधिक वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ४ लाख ७५ हजार ७९ एवढे अर्ज असून, विज्ञान विद्याशाखेसाठी २ लाख ९२ हजार ६०० अर्ज आणि मानव्यविज्ञान शाखेसाठी १ लाख २ हजार ८२५ एवढे अर्ज विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत.

शाखानिहाय अर्ज

* बी. कॉम. : १,८८,३९०

* बी. कॉम. (मॅनेजमेंट स्टडीज) : ४१,०५१

* बी. कॉम. (अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्स) : १,११,८१२

* बी.एस्सी. : ४१,२९२

* बी.एस्सी. आयटी : १,०४,९८४

* बी. एस्सी. कम्प्युटर सायन्स : ६६,१८७

* बी.ए. : ६०,८२६