मुंबई : गेल्या वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी प्रभारी अधिकारी कार्यरत असल्यामुळे निकाल गोंधळ उडत असून संचालकपदी पूर्णवेळ अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी अलीकडेच मुलाखती घेऊनही निवड समितीने कोणत्याही उमेदवाराच्या नावाची शिफारसच केली नव्हती. त्यामुळे या पदासाठी विद्यापीठाने पुन्हा नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आता या पदासाठी गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://mu.ac.in/carees या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. आता या नव्या निवड प्रक्रियेतून संचालकपदी योग्य व्यक्तीची पूर्णवेळ निवड होईल आणि निकाल गोंधळ सुटेल, अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध; २६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार
नव्या निवड प्रक्रियेतून संचालकपदी योग्य व्यक्तीची पूर्णवेळ निवड होईल आणि निकाल गोंधळ सुटेल, अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-10-2023 at 17:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university again published advertisement for the post of director of board of examination and evaluation mumbai print news css