मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष ‘बी.ए.’च्या सहाव्या सत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. या परीक्षेत ४९.३१ टक्के म्हणजे ४ हजार ६७५ विद्यार्थी उत्तीर्ण आणि ५०.६९ टक्के म्हणजेच ४ हजार ८०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल विद्यापीठाने निर्धारित वेळेत म्हणजेच ३० दिवसांच्या आत जाहीर केला आहे.

हेही वाचा : मुंबई: ‘अभियांत्रिकी’ सत्र ८ आणि ‘बीएमएस’ सत्र २ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
This years Maharashtra State Board exams include changes in grace marks awarding process
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Board exam preparation tips 2025
Board Exam 2025 : १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! बोर्डाच्या परीक्षेत १०, १५ मिनिटे अधिक का दिली जातात? परीक्षेला जाण्याआधी घ्या जाणून…
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…

मुंबई विद्यापीठाच्या ‘बी.ए.’ अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष सहाव्या सत्र परीक्षेसाठी एकूण १३ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ४ हजार ६७५ विद्यार्थी उत्तीर्ण व ४ हजार ८०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर ६०४ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. दरम्यान, ४५ विद्यार्थ्यांचे निकाल हे गैरप्रकरणामुळे (कॉपी) राखीव ठेवण्यात आले आहेत. तर २ हजार २४३ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणास्तव प्रवेश निश्चित न झाल्यामुळे ९२८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली. विद्यापीठाने आतापर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्रातील विविध ७४ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना सदर निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

Story img Loader