मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्रातील वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील सहाव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. मात्र या परीक्षेत ५७ टक्के म्हणजे तब्बल २१ हजार ५९२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर ४३.५२ टक्के म्हणजे १६ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल विद्यापीठाने निर्धारित वेळेत म्हणजेच फक्त २४ दिवसांत जाहीर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक

मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष व सहाव्या सत्र परीक्षेसाठी एकूण ५४ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १६ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण व २१ हजार ५९२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर २ हजार ४२३ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. दरम्यान, ९५ विद्यार्थ्यांचे निकाल हे गैरप्रकरणामुळे (कॉपी) राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ८ हजार ६८८ विद्यार्थ्यांचे निकाल हे प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली. विद्यापीठाने आतापर्यंत उन्हाळी सत्रातील ८ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना सदर निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university commerce result declared in just 24 days 57 percent student failed mumbai print news css
Show comments