मुंबई : मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई विद्यापीठाने शनिवार, १ जून रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी’ शाखेची सत्र ८ आणि बीएमएस (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.

हेही वाचा : जीर्ण इमारती, दरडप्रवण क्षेत्रांची पाहणी; आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयाने वांद्रे, अंधेरी, व मालाडमध्ये पाहणी

दरम्यान शुक्रवार, ३१ मे रोजी मुंबई विद्यापीठातर्फे विविध विद्याशाखांच्या एकूण ४३ परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये विज्ञान शाखेच्या ३, अभियांत्रिकी शाखेच्या २७, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ८, मानव्यविज्ञा शाखेची १ आणि आंतरविद्या शाखेच्या ४ या परीक्षांचा समावेश आहे. परंतु या ४३ परीक्षांवर मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आलेल्या ‘जम्बो ब्लॉक’चा कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.