लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : मुंबई विद्यापीठाची बहुप्रतीक्षित नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एप्रिलअखेरीस होणार असून पुन्हा नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या रणधुमाळीत मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने मतदार नोंदणीप्रक्रियेत काहीसा बदल केला आहे. आता सर्व अर्जदारांना नोंदणीकृत पदवीधर म्हणून नोंदणी अर्ज सादर होईपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व अर्जदारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करावा लागेल आणि कोणत्याही अर्जदाराने विद्यापीठाकडे प्रत्यक्ष पद्धतीने ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट सादर करू नये, असे मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

आणखी वाचा-मुंबई : फटाक्यांचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

जुनी मतदारयादी ग्राह्य धरावी, प्रत्यक्ष अर्ज जमा करणे ऐच्छिक करावे, आधारकार्ड बंधनकारक करावे, तसेच ओटीपीची आवश्यकता नसावी आणि अर्जामध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांसाठी विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने मतदार नोंदणीप्रक्रियेत काहीसा बदल केला आहे. त्याचबरोबर जुन्या मतदार नोंदणी प्रक्रियेनुसार म्हणजेच ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या जाहीर प्रकटनाच्या अनुषंगाने ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केले असतील, त्यांना स्वतःच्या लॉगीनमध्ये अपलोड केलेली कागदपत्रे (सॉफ्ट कॉपी) गुरुवार, १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सांयकाळी ५ वाजल्यानंतर डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहेत. तसेच नव्याने अर्ज भरताना सर्व अर्जदारांनी संबंधित जागेवर स्पष्ट दिसण्याजोगी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असेल. तर अपलोड केलेली कागदपत्रे योग्य आहेत की नाही याची खातरजमा अर्जदाराने स्वतः करायची असून याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची असेल, असेही विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधरांना गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://mu.ac.in या संकेस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.