अपुरा वेळ आणि आवश्यक पाठयपुस्तकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांनी केली होती मागणी

मुंबई : मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटी, विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्रासंबंधित गोंधळाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’मधील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या (एमएमएस – दोन वर्षीय अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांनी ऐनवेळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे अभ्यास करण्यासाठी मिळालेला अपुरा वेळ आणि आवश्यक पाठ्यपुस्तकांच्या कमतरतेमुळे पहिल्या सत्राची परीक्षा किमान एक महिना पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यानंतर सदर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयडॉल विभागाने घेतला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागात २०२१-२२ मध्ये पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमाला (एमएमएस – दोन वर्षीय अभ्यासक्रम) सुरुवात झाली. पहिल्या तुकडीची परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात झाली. परंतु शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या दुसऱ्याच तुकडीमधील विद्यार्थ्यांची परीक्षा पहिल्यांदाच ऑफलाइन पद्धतीने १६ ते २४ मे २०२३ या कालावधीत पार पडणार होती. तर अभ्यासासाठीचे साहित्य संकेतस्थळावर उपलब्ध आहे, मात्र आवश्यक ती पाठ्यपुस्तके आयडॉलमध्ये प्रत्यक्षात उपलब्ध नाहीत. याचसोबत अनेक पाठयपुस्तकांमधील गणितीय सूत्रेही चुकीची असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
MPSC State Services Exam 2023, MPSC State Services Exam 2023 Result, MPSC Result Process ,
‘एमपीएससी’चा ढीसाळपणा : निकालाच्या तीन महिन्यांपासून संपूर्ण प्रक्रिया रखडली…
reasearcher obc fellowship delay by government
ओबीसी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपला केंद्र सरकारकडून विलंब, विद्यार्थी अडचणीत; कारण काय?
neet marathi news
अन्वयार्थ : प्रवेश परीक्षा ‘नीट’ व्हाव्यात म्हणून…

हेही वाचा >>>वीजदेयक आंदोलनप्रकरण राहुल नार्वेकर, लोढांविरोधात आरोप निश्चिती

‘एमएमएस’च्या पहिल्या सत्राला एकूण आठ विषय आहेत. यापैकी सहा विषयांचे अध्ययन साहित्य छापील स्वरूपात उपलब्ध आहे. दोन विषयांच्या अध्ययन साहित्याची प्रत ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. सदर दोन विषयांचे अध्ययन साहित्य हे छपाईसाठी पाठविण्यात आले असून, लवकरच ते उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले आहे, असे यावर आयडॉल विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

‘परीक्षेबाबतची पूर्वकल्पना ही किमान एक महिना आधी दिली जाते. पण परीक्षेचे वेळापत्रक अवघ्या १५ दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले. अनेक विद्यार्थी नोकरी करून ‘आयडॉल’मध्ये शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना तातडीने रजा मिळणे कठीण झाले आहे. ते परीक्षेलाही मुकण्याची शक्यता आहे. अभ्यास करण्यासाठी अपुरा वेळ आणि आवश्यक पाठ्यपुस्तकांची कमतरता असल्यामुळे, परीक्षा किमान एक महिना पुढे ढकलून जून महिन्यात घ्यावी’, असे एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा >>>बारसू आंदोलकांवरील गावबंदी आदेश मागे घेणार ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

याबाबत युवा सेनेने मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पत्र पाठवून सदर परीक्षा एक महिना पुढे ढकलून, विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व पाठ्यपुस्तके तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, असे युवा सेनेचे मुंबई विद्यापीठातील माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

Story img Loader