अभिषेक तेली, लोकसत्ता

मुंबई: मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’ विभागाच्या परीक्षा या येत्या २० जूनपासून सुरु होत आहेत. परंतु आयडॉलमध्ये प्रवेश घेऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना अद्याप छापील स्वरूपात अध्ययन साहित्य देण्यात आलेले नाही. आयडॉल विभागामध्ये अनेक विद्यार्थी हे काम करताना शिक्षण घेत आहेत, परंतु प्रशासनाच्या या कारभारामुळे परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सध्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

वाणिज्य शाखेची सहाव्या सत्राची परीक्षा (बी. कॉम) २० जून आणि कला शाखेची सहाव्या सत्राची परीक्षा (बी. ए) २७ जूनपासून सुरू होत आहे, परंतु अद्यापही विद्यार्थ्यांना आवश्यक ते अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. ‘एमएमएस’ची पहिल्या व तिसऱ्या सत्राची परीक्षा ६ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. सदर अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य हे संकेतस्थळावर उपलब्ध आहे, मात्र आवश्यक त्या पाठयपुस्तकांच्या छापील प्रती आयडॉलमध्ये उपलब्ध नाहीत. याचसोबत एमएमएसच्या अनेक पाठयपुस्तकांमधील गणितीय सूत्रेही चुकीची आहेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर अनेक अभ्यासक्रमांची आवश्यक ती पाठयपुस्तके छापील स्वरूपात आयडॉल विभागामध्ये उपलब्ध नसून, त्यांचे वितरण अद्यापही विद्यार्थ्यांना करण्यात आलेले नाही.

हेही वाचा… चार महिन्यांनंतरही निकालाची प्रतीक्षा; मुंबई विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल रखडले

संकेतस्थळावर अभ्यास साहित्य उपलब्ध असले तरी आयडॉल विद्यार्थ्यांना ते छापील स्वरूपातही देते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्कही घेतलेले असते. तसेच आता ऑनलाईन पुस्तकांची प्रत घ्यायची झाल्यास विद्यार्थ्यांसाठी ते काहिसे खर्चिक ठरणारे आहे. तसेच पाठयपुस्तकांची प्रत संकेतस्थळावरून डाउनलोड करताना अनेक तांत्रिक अडचणीही येत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

हेही वाचा… मुंबई: अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केल्यानंतर पाच वर्षांनी प्रियकराचीही हत्या; आरोपीला अटक

‘आयडॉलमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी जेव्हा विद्यार्थ्यांकडून प्रवेशशुल्क घेतले जाते, तेव्हाच त्यांच्याकडून अध्ययन साहित्यासाठीही पैसे आकारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांच्या केवळ ऑनलाइन प्रती उपलब्ध करून न देता, छापील प्रतीही वेळेत देणे आवश्यक आहे. विद्यापीठाचा स्वतःचा छापखाना असूनही विद्यार्थ्यांना छापील पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात का दिरंगाई होत आहे?’ असा प्रश्न मुंबई विद्यापीठातील मनविसेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केला आहे.

भाषांतरामुळे उशीर…

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागात पहिल्यांदाच सत्र पद्धत सुरु करण्यात आली. गतवर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वार्षिक पद्धतीनुसार अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु या वर्षापासून सत्रानुसार विविध अभ्यासक्रमांच्या विविध विषयांची पाठयपुस्तके ही https://old.mu.ac.in/study-material-semester-pattern/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पाठयपुस्तकांचे मराठी भाषेत अनुवाद करण्यास प्राध्यापकांना वेळ लागत असल्यामुळे, पाठयपुस्तके ही छापण्यासाठी दिली जात नाहीत. परंतु काही अभ्यासक्रमांची पाठयपुस्तके ही छापून पूर्ण झालेली असून, त्याचे विद्यार्थ्यांना वितरण सुद्धा करण्यात आले आहे. उर्वरित अभ्यासक्रमांसाठी आवश्यक पाठ्यपुस्तके छपाईसाठी पाठविण्यात आली असून, लवकरच ती विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे ‘आयडॉल’ विभागाने स्पष्ट केले आहे.