मुंबई : संग्रही असलेली ऐतिहासिक नाणी जतन करण्यासाठी काहीच करत नसल्याबाबत आणि स्वतःचे संग्रहालय मोडकळीस आलेले असताना या नाण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने त्यांचा लिलावही होऊ देत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठावर मंगळवारी ताशेरे ओढले.
संग्रहालयात काही नाणी आहेत. परंतु, ती पुरातन नाहीत, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचीही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने दखल घेतली. तसेच, संग्रहालयातील विद्यापीठाच्या मालकीची नाणी चोरीला गेली आणि त्याविरोधात विद्यापीठाने काहीच पावले उचलली नसल्यावरून न्यायालयाने फटकारले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. त्यावर, नाणी परत करण्यासाठी मोदी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आला. या प्रकरणी चौकशीही करण्यात आली. परंतु, पोलीस तक्रार केली नाही, असे विद्यापीठाच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
हेही वाचा >>>मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण…राजू शेट्टी, ‘हास्यजत्रा’फेम गौरव मोरे, निखिल बने, शिव ठाकरे यांचा समावेश
विद्यापीठाच्या या उत्तरावर न्यायालयाने संताप व्यक्त केला. ही विद्यापीठाची मालमत्ता होती, ती चोरीला गेल्यानंतरही विद्यापीठाने ती परत मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. ही नाणी शोधण्यासाठी विद्यापीठाला न्यायालयीन आदेशाची गरज आहे का ? असा उद्विग्न प्रश्नही न्यायालयाने केला. तसेच, ही नाणी केवळ विद्यापीठाची मालमत्ता नाही किंवा ती केवळ धातूही नाहीत, तर ती अमूल्य असून देशातील जनतेची मालमत्ता असल्याचे न्यायालयाने विद्यापीठाला सुनावले. त्याचवेळी, याचिकेत अनेक आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आले आहेत. तथापि, संग्रहालय, तसेच मोदी यांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व नाण्यांची यादी तयार करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. याशिवाय, विद्यापीठाकडे असलेली नाणी कोणासाठी लिलाव करण्यात आली होती. विद्यापीठाच्या मालकीची आणि आणि मोदी यांच्याकडील सुरक्षित ठेवण्यासाठी ती उच्च न्यायालयात जमा करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
हेही वाचा >>>बुलेट ट्रेनच्या स्थानकांतील पायाभूत सुविधांच्या कामाला वेग; १२ स्थानकांमध्ये ९० सरकते जिने बसविणार
मुंबई कॉइन सोसायटीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय आणि न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठाने हे संग्रहालय आणि ऐतिहासिक नाण्यांच्या संवर्धनाबाबत उदासीन असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.
दरम्यान, विद्यापीठाने आपल्या कलिना संकुलात १५,००० चौरस फूट क्षेत्रफळावर दिनेश मोदी न्यूमिस्मॅटिक संग्रहालय सुरू केले होते. त्यात, भारतीय आणि विदेशी नाण्यांसाठी प्रत्येकी तीन हजार चौरस फुटाची दोन प्रशस्त दालने आहेत. संग्रहालयाने प्रकाशित केलेल्या माहितीपत्रकानुसार, त्यात विविध धातूंच्या २५ हजारांहून अधिक नाण्यांचा संग्रह आहे. तसेच, चलनी नोटा संग्रही आहेत. ही नाणी खुद्द मोदी यांनी विद्यापीठाला दान केली होती. शिवाय, ११९३ मध्ये मुंबई कॉईन सोसायटीने लिलाव केलेली काही नाणीही विद्यापीठाकडे संग्रही आहेत. तथापि, वर्षानुवर्षे, संग्रही असलेली काही नाणी हरवली किंवा चोरीला गेली आहेत. मोदी यांनी विद्यापीठाला दान केलेली अनेक नाणी त्यांच्याकडे ठेवल्याचाही आरोप याचिकाकर्त्यांचा आहे.