पदवीच्या प्रथमवर्ष प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना तुकडय़ा वाढवून देण्यास अखेर मान्यता दिली. यानुसार विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमासाठी १० टक्के तर स्वयं अर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठी १५ टक्के जागा वाढविण्याची मुभा देण्यात येणार आहे.
बारावी परीक्षेचा निकाल विक्रमी लागल्याने पदवी प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या महाविद्यालयांमधील उपलब्ध जागा वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बठकीत यावर चर्चा झाली. त्यानंतर बीए, बी.कॉम आणि बीएसस्सी या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना जागांमध्ये १० टक्के जागा वाढविण्याची मुभा देण्यात आली आहे. तर  स्वयं अर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याने या अभ्यासक्रमांच्या १५ टक्के जागा वाढविण्यास महाविद्यालयांना मंजुरी देण्यात येणार आहे. विद्यापीठाकडे १२१ महाविद्यालयांनी अगोदरच वाढीव तुकडय़ांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनेक महाविद्यालयांमध्ये अधिक विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था होणार नसल्याने यासाठी नवीन तुकडय़ांना मंजुरी देण्याचा निर्णयही या बठकीत घेण्यात आला आहे. तुकडी वाढीचे प्रस्ताव आल्यानंतर त्यांना तातडीने मान्यता देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी सांगितले.
या संस्थांना स्वायत्तता
दरम्यान, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ‘जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्था’ व ‘वेिलगकर’ या दोन संस्थांना स्वायत्त दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या बठकीत घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा