मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’चा (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) निकाल मंगळवारी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये हा निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. परीक्षेचा एकूण निकाल ५४.१४ टक्के इतका लागला आहे. एकूण चार विद्याशाखेतील विविध ७९ विषयांसाठी ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. एकूण ४,७८५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते.
हेही वाचा >>> मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार
त्यापैकी एकूण २,५९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ११०९ विद्यार्थी, तर १४८२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील २३०१ विद्यार्थ्यांपैकी ११७१ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील ७८४ विद्यार्थ्यांपैकी ४६८ विद्यार्थी, मानव्यविद्याशाखेतील १२३५ विद्यार्थ्यांपैकी ५७१ विद्यार्थी तर आंतरविद्याशाखेतील ६६३ विद्यार्थ्यांपैकी ३८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.