मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यंदा १३ हजार ४०६ मतदारांपैकी जवळपास ५५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानुसार ७ हजार २०० मतांपैकी ६ हजार ६८४ मते वैध आणि ५१६ मते अवैध ठरली आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना विजयासाठी जवळपास १ हजार ११४ मतांचा कोटा पार करणे आवश्यक आहे.

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत युवा सेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने सर्वच्या सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मुख्य लढत ही युवा सेना आणि ‘अभाविप’ यांच्यात होत आहे. तसेच नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर प्रत्येकी १ जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३, महिला प्रवर्गातून २ असे एकूण २८ उमेदवार १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर राखीव प्रवर्गातून पाचही जागांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार आघाडीवर असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

Police died falling from local, Mumbai local,
मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News Live : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का; युवासेनेचे ७ उमेदवार विजयी
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
woman reacted ruckus inside the office of Devendra Fadnavis
Video: लाडक्या बहिणीने कार्यालयाची नासधूस केली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणीतरी जाणीवपूर्वक…”

हेही वाचा – मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू

हेही वाचा – मुंबई : टाटा रुग्णालयातील प्रोटॉन उपचार पद्धती रुग्णांसाठी वरदान

‘युवा सेनेने राखीव प्रवर्गातील सर्व जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. या उमेदवारांना सुमारे पाच हजार मते मिळाली आहेत. तर ‘अभाविप’च्या उमेदवारांना ८०० ते १ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे हे उमेदवार निश्चितच विजयी होतील, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. शिंदे – भाजप सरकार सुरुवातीपासूनच रडीचा डाव खेळत होते. परंतु तरीही आम्ही सर्व जागांवर विजय संपादन करू,’ असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.