मुंबई : बहुप्रतिक्षित व बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचलेली असताना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. एका वर्षात दुसऱ्यांदा निवडणूक स्थगित करण्याचा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण पसरलेले असून मुंबई विद्यापीठ प्रशासनावर टीकेचे ताशेरे ओढले जात आहेत. दरम्यान, विविध कारणांमुळे रखडलेली मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक तब्बल दोन वर्षांनंतर रविवार, २२ सप्टेंबर रोजी होणार होती आणि त्यानंतर बुधवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असताना ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा – बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

हेही वाचा – सागरी किनारा मार्ग आता सातही दिवस रात्री १२ वाजेपर्यंत खुला, रात्री १२ नंतर प्रकल्पाची उर्वरित कामे करणार

मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकात नेमके काय ?

मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अवघा एक दिवस उरलेला असताना एक परिपत्रक प्रसिद्ध करून निवडणूक स्थगित करत असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीची अधिसूचना ३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कळविण्यात येते की महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.