मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एका वर्षात दुसऱ्यांदा स्थगित केल्यानंतर विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आणि राजकीय वातावरणही तापले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवडणूक मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची नवीन तारीख नोंदणीकृत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचवताना विद्यार्थी संघटना व उमेदवारांची धावपळ सुरू आहे. व्हॉइस कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप मेसेजद्वारे नोंदणीकृत पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या नवीन तारखेबाबत कल्पना दिली जात आहे.

नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही पसंतीक्रमाच्या मतांनुसार होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांना अधिक महत्त्व असते. त्यामुळे पहिल्या पसंतीक्रमाची मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी विद्यार्थी संघटना सुरुवातीपासूनच मतांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेल्या आहेत. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून संघटनांकडून जोरदार प्रचार सुरू असून विविध माध्यमातून नोंदणीकृत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी काही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. त्यांना विजयाची आस लागली आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन निवडणूक व उमेदवारांसंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. तसेच निवडणुकीचा वचननामा, कार्य अहवाल आणि विविध ध्येय व उद्दिष्ट्यांचा उल्लेख असलेले निवेदन देऊन मतदान करण्याचे आवाहनही केले जात आहे. काही उमेदवारांनी चक्क स्पीड पोस्टद्वारे मतदारांच्या घरी निवेदन पोहोचवले आहे. मात्र या निवेदनावर निवडणुकीची जुनी तारीख नमूद असल्यामुळे हे उमेदवार आता व्हॉइस कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप मेसेजद्वारे मतदारांना नवीन तारखेची कल्पना देत आहेत. मतदान केंद्र आणि बूथमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी

हेही वाचा – मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील छायाचित्र मित्राला पाठवले, अल्पवयीन मुलासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही २२ सप्टेंबर ऐवजी २४ सप्टेंबर रोजी आणि निकाल हा २५ सप्टेंबर ऐवजी २७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध करून स्पष्ट केले. मात्र या बदलाबाबत काही मतदारांना कल्पना नसल्यामुळे ते रविवारीच मतदान केंद्रांवर जाऊन पोहोचले आणि त्यांचा गोंधळ उडाला. ‘मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची तारीख बदललेली आहे, याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे मी ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी मालाडमधील एका महाविद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर जाऊन पोहोचलो. तिथे जाऊन कळले की रविवारी मतदान नाही. मुंबई विद्यापीठाने सर्व मतदारांना लवकरात लवकर ‘एसएमएस’ पाठवून कल्पना द्यावी’, असे एका मतदाराने सांगितले.

नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक व निकालाच्या नवीन तारखेसंदर्भातील परिपत्रक मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमे व इतर विविध माध्यमातून कळविण्यात आले आहे. तसेच नोंदणीकृत पदवीधर मतदारांना ‘एसएमएस’द्वारेही कळविण्यात येत आहे. – डॉ. प्रसाद कारंडे, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई विद्यापीठ

हेही वाचा – लिपिक पदाच्या भरतीसाठी मुंबई महानगरपालिकेची पुन्हा जाहिरात, प्रचंड विरोधानंतर ‘ही’ अट वगळली

मतदारांना कार्यालयीन वेळेत दोन तासांची सवलत द्या किंवा सुट्टी जाहीर करा

नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही रविवार, २२ सप्टेंबर रोजी सुट्टीच्या दिवशी होणार होती. मात्र स्थगितीनंतर ही निवडणूक मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी कार्यालयीन दिवसांमध्ये होत आहे. त्यामुळे सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदान केंद्रावर पोहोचताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांना राज्य सरकारने कार्यालयीन वेळेत दोन तासांची सवलत द्यावी किंवा सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी काही मतदार व उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader