मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्रातील अंतिम वर्षाच्या सत्र ६, सत्र ८ व सत्र १० च्या परीक्षा एप्रिल व मे २०२३ मध्ये घेतल्या होत्या. निकालाभावी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने बी.एम.एस, बॅफ, बीबीआय, बीएफएम, बीएस्सी सत्र ६ व विधी शाखा सत्र ६ आणि सत्र १० या सात परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. सदर परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्य्यात असून निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ :सोडतपूर्व प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने उन्हाळी सत्रातील परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागतात आणि नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने त्यांची धडपड सुरू होते. यामुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत होऊन निकाल जाहीर होण्यास उशीर होऊ नये यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे हे सदर प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेऊन आहेत. संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे. तर उन्हाळ्याची सुट्टी असतानाही शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम सत्र परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले असून, सदर परीक्षेमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ४ जुलैपासून सुरू होत आहे.