डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाचे प्रकरण खूपच चिघळले असून आता थेट राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी डॉ. वेळूकर यांना विद्यापीठाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा, अशी सूचना केली.
डॉ. हातेकर यांचे निलंबनानंतर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन तसेच विविध राजकीय पक्षांनी केलेला हस्तक्षेप लक्षात घेऊन राज्यपालांनी डॉ. वेळूकर यांना बोलावणे पाठविले होते. गुरुवारी संध्याकाळी राज्यपाल आणि कुलगुरू यांची भेट झाली. याभेटीत हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा आणि यासाठी योग्य ती कार्यपद्धती पाळावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रकरणाची दखल घेत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही या प्रकरणाचा अहवाल पोहोचल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा